ही तर भयकंपाची नांदी…  

 ( इशारा-  प्रस्तुत पत्रकारानं विविध स्तरावरील न्यायालयीन कामकाजाचं वृत्तसंकलन केलेलं आहे . त्यामुळे न्यायालयानं दिलेला निकाल आणि न्याय , निकाल आणि निकालाचे परिणाम / पडसाद , न्यायालयाची बेअदबी , अर्ज आणि याचिका यातील फरक तसंच खालच्या स्तरावरील न्यायालयानं दिलेल्या कोणत्या निकालाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील कसं करता येतं , हे …

‘त्या’ पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईची धमक दाखवा !

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातले सरकार पाडण्याचा प्रयत्न आयपीएस सेवेतील काही पोलीस अधिका-यांनी केला , असा दावा राज्याचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी एका बड्या वृत्तपत्राच्या वार्ताहराशी बोलतांना केला आणि नंतर ‘मी असं बोललोच नाही’ असं घूमजावही केलं . तोच नाही तर , कोणताही किमान जबाबदार पत्रकार  समोरच नेता काही …

देवरुख , कोंडविलकर आणि…

|| नोंद…१४|| रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख या गावाशी संबंधित १९७९-८० अशा दोन वर्षातल्या अनेक आठवणी आहेत .  त्यातल्या काही अलवार आणि भावनाप्रधानही आहेत . तसं तर , एकूणच कोकणातल्या आठवणी  रेशमाच्या मऊशार लडी हळुवार उलगडत जाव्यात तशा आहेत . अनुभवाच्या पोतडीत लपलेली ती कांही गुजं आहेत . तेव्हा वयाच्या पंचवीशीत होतो …

प्रेरणेचा प्रवास – प्रश्नातून पुढच्या प्रश्नाकडे हवा

( ‘युवा मन्वंतर’ आणि ‘कल्पक विद्यार्थी समूह’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रेरणेचा प्रवास’ या विषयावरील व्याख्यानाचा हा संपादित अंश . ज्यांना मूळ व्याख्यान ऐकायचे असेल त्यांच्यासाठी यूट्यूबवरील या व्याख्यानाची लिंक  https://youtu.be/u0vfirP0eQI अशी आहे .  ) ‘प्रेरणेचा प्रवास’  असा विषय मला देण्यात आलेला आहे.  या विषयासाठी मला संयोजकांनी योग्य …

दि. भा. घुमरे – एक भिडस्त संपादक !

दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे यांच्या मृत्यूची बातमी तशी अनपेक्षित नाही तरी त्या बातमीनं मन विदीर्ण झालं , डोळ्यात अश्रू आले  ,कारण त्यांचा प्रभाव माझ्यावर होता .   महात्मा गांधी आणि विनोबा यांचा अभ्यासक असलेला एक हिंदुत्ववादी , विद्वान पण भिडस्त संपादक अशी माझ्या मनावरची मामासाहेब घुमरे यांची प्रतिमा आहे …

काँग्रेस , पक्ष की समृद्ध अडगळ ?

सध्या जी कांही अंतर्गत सुंदोपसुंदी माजलेली आहे , कलह सुरु आहे आणि त्यातच अध्यक्षपदाचा सावळागोंधळ सुरु आहे , त्यामुळे देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष एक समृद्ध अडगळ झाल्यासारखी स्थिती आहे . सलग दोन लोकसभा निवडणुकांच्या पराभवाच्या मानसिकतेतून हा पक्ष सावरणं , कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण करुन संघटना मजबूत करणं आणि काँग्रेस पक्षानं …

सर्वपक्षीय राजकीय ढोंग !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या संसदेच्या अधिवेशनातला प्रश्नोत्तराचा त्रास गुंडाळण्याच्या सत्ताधारी भाजपच्या इराद्याला काँग्रेससकट अनेक विरोधी पक्षांनी केलेला विरोध आपल्या देशातील संसदीय लोकशाही सुदृढ ठेवण्यासाठीचा प्रयत्न आहे , असं जर कुणाला वाटत असेल तर तो शुद्ध भाबडेपणा आहे , हे एकदा सांगून टाकायला हवं . मुळात संसद किंवा विधिमंडळांचं कामकाज सुरळीत चालावं …

परक्या शहरात माणसानं झाडासारखं रुजावं…

|| नोंद …१३  ||       दिल्लीतल्या मराठी माणसाच्या परकेपणाच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार आणि दोस्तयार विजय सातोकर यानं माझी प्रतिक्रिया ‘आमची दिल्ली’ या उपक्रमासाठी घेतली , तेव्हा त्यानं विचारलं अनेक वर्ष एखाद्या शहरात राहूनही ते गाव अनेकांना आपलं का वाटत नाही ?’ त्यावर मी उत्तर दिलं , ‘परक्या शहरात …

पत्रकारांचे पंतप्रधानांसोबतचे परदेश दौरे : समज आणि गैरसमज

एकुणातच सध्या समाज माध्यमांवर ऐकीव माहितीवर आधारित पण , तज्ज्ञांच्या आविर्भावात ‘पोस्टाय’ची फॅशन काँग्रेस गवत आणि भक्तांपेक्षा जास्तच जोरदार फोफावलेली आहे . आमच्या लहानपणी कुणी , अपुरी माहिती किंवा वायफळ बडबड करायला लागलं की , वडीलधारी मंडळी ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’ असं करत नको जाऊस , या शब्दांत झापून …

‘आई’ , माई आणि गिरीश कर्नाड…

अजूगपणातल्या नोंदी …१२ केबिनबंद आणि वाचकांपासून फटकून राहणारी पत्रकारिता मला कधीच जमली नाही . लोकात मिसळावं , त्यांचा कल जाणून घ्यावा . विशेषत: तरुण मुलांशी गप्पा माराव्यात , त्यांना काय वाचायला आवडतं , राजकारणाविषयी त्यांना काय वाटतं , त्यांची भाषा , फॅशन , गाण्यांची आवड जाणून घ्यायला आवडत असे . …