आम्ही पदवीधर ‘लढवल्या’ची कथा !

नोंद …१८ पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर सदस्य निवडून देण्याच्या निवडणुकीची महाराष्ट्रात सध्या धुमधाम सुरु आहे . त्यानिमित्ताने आम्हीही लढवलेल्या अशा एका निवडणुकीची धमाल आठवली . आम्ही म्हणजे प्रकाश देशपांडे , सिद्धार्थ सोनटक्के आणि मी . आम्हा तिघांचं तेव्हा त्रिकूट होतं ( तोवर धनंजय गोडबोले आमच्या गोटात सामील व्हायचा होता ) …

अहमद पटेल नावाची काँग्रेसी दंतकथा !

राजकारणातल्या वाचाळवीरांना तसंच पिंजऱ्यातल्या पोपटांसुद्धा ‘चाणक्य’ म्हणण्याची फॅशन सध्या माध्यमांत आलेली आहे . दाते शब्दकोशात ‘चाणक्य’ या शब्दाचा अर्थ आहे ‘जात्या धूर्त , चतुर आणि उत्तम वक्ता इत्यादी गुणांनी युक्त .’ हे आठवण्याचं कारण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि हंगामी पक्षाध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचं नुकतचं …

नाना नावाची वाजंत्री…

नोंद …१७ ( लेखातील चित्रे प्रातिनिधिक आहेत ) आठवण तशी जुनी आहे ; जुनी म्हणजे झाली असतील ४५ ते ४८ इतकी वर्ष पण , मनात रुतून बसलेली आहे . लक्ष्मण काळेचा फोन आला , तो म्हणाला , ‘नाना गेला’ . डोक्यात वाजंत्री जोरजोरात वाजू लागली ती अजून वाजंत्री थांबतच नाहीये …

काँग्रेसच्या पिंजर्‍यातील पोपटांची फडफड !

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या एका कमेंटमुळे विरोधकांना जितका आनंद झाला त्यापेक्षा जास्त आसुरी आनंद काँग्रेसमधील कांही पोपटांना झालेला असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसतं आहे . ‘उत्सुक पण पुरेशी तयारी नसलेला विद्यार्थी’ अशा ज्या बातम्या प्रकाशित या संदर्भात प्रकाशित झाल्या आहेत त्या संदर्भ सोडून …

राजकीय वृत्त संकलनाचं वळण !

〈 महात्मा गांधी मिशनच्या ‘गवाक्ष’ या गृह नियतकालिकाच्या दिवाळी अंकातील लेख- 〉 आयुष्य कधीच एका सरळ रेषेत नसतं . जगण्याच्या वाटेवर खाच-खळगे , चढउतार आणि अवघड वळणंही असतातच . जगण्याच्या या रस्त्यावरुन चालताना हे अडथळे कुणालाच टाळता येत नाहीत . काही वळणं वेदनादायक , काही कसोटी पाहणारे तर काही जगण्याला कलाटणी देणारे असतात . …

‘भाजप’नुकूल कल !

हा मजकूर लिहायला घेतला तेव्हा रात्रीचे आठ वाजले असून बिहार विधानसभा निवडणुकीचे कल आता पुरेसे स्पष्ट झालेले आहेत . या निवडणुकीचे सर्व निकाल हाती येण्यास अजून वेळ आहे परंतु , मतमोजणीच्या बहुसंख्य फेऱ्या संपल्या  आहेत . त्यामुळे हे कल कायम राहतील असं दिसतंय . कोरोनामुळे जे काही सावधगिरीचे उपाय अवलंबण्यात आले …

सेलफोन नसतांचे रंगकल्लोळ !

    नोंद …१६  ( मजकुरातील रंगचित्रे आदिती जोगळेकर-हर्डीकर यांची आहेत ) आठवण तशी बरीच जुनी आहे पण , विद्यमान ‘गॅजेट’मय काळात सांगायला हवीच . हलकासाच धक्का देऊन रेल्वे हलली आणि त्याचवेळी सेलफोनने जीव जात असल्याचा टाहो ‘बीप’ असा आवाज करुन फोडला . रात्री चुकून सेलफोन चार्ज करायचा   राहिला , …

बिहारचा राजकीय कल बदलतोय ?

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं असतांनाच बिहारमधलं राजकीय वातावरण बदलू लागल्या असल्याच्या वार्ता आल्या आहेत . या निवडणुका जाहीर होण्याआधी बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल युनायटेड आणि भाजप यांची युती आरामात  निवडून येईल असं एकूण वातावरण होतं . माध्यमांमध्ये प्रकाशित होणाऱ्या बातम्याही त्याच आशयाच्या होत्या . काही …

नाथाभाऊंच्या असंतुष्ट भारुडाची सांगता !

हा मजकूर प्रकाशित होईल ; तेव्हा भाजपाचे एक ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असेल . या पक्षांतरानं गेले जवळजवळ पावणेतीन वर्ष एकनाथ खडसे यांच्या मनात खदखदणार्‍या असंतोषाच्या भारुडाची सांगता झाली आहे . खरं तर , या सांगतेला तसा उशीरच झाला आहे .  मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यावर …

एका कवीच्या अकाली मृत्यूची इष्टापत्ती !

|| नोंद …१५ || आठवी – नववीत शिकत असल्यापासून कवितेत आणखी रस निर्माण झाला . त्याचं एक कारण दादा गोरे ; तेव्हा ते शाळेत शिक्षक होते आणि ते सध्या साहित्य व्यवहारच्या संस्थात्मक राजकारणाच्या उलाढालीत बडं प्रस्थ तसंच ज्येष्ठ समीक्षक आहेत . तेव्हा ते आमचे भाषेचे शिक्षक होते . विशेषतः कविता …