उपेक्षा, तुझे नाव नरसिंहराव !

एखाद्याच्या पराभवातही अशी विजयाची ऐट असते की आपण आचंबित; क्वचित नतमस्तकही होतो आणि काहींचा विजयही उपेक्षेचा धनी ठरतो. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव (जन्म- २८ जून १९२१ / मृत्यू- २३ डिसेंबर २००४) हे देशाच्या राजकारणातील अशाच उपेक्षेचे नाव. एका मुलग्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ‘हैदराबादेतील बंजारा हिल्स भागातील मालमत्ता विकावी, अन्य कोणाकडूनही मदत …

एक वर्षापूर्वी आणि नंतर…

(सर्व परिचित वाचक चळवळ ग्रंथालीचे मुखपत्र असलेल्या ‘शब्दरुची’ या मुखपत्राच्या मे २०१५च्य अंकाचा अतिथी संपादक मी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे एक वर्ष ही या अंकाची थीम आहे. या अंकासाठी मी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित भाग- चित्र संकल्पना : विवेक रानडे ) मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीएचे सरकार पायउतार …

राणे नावाची महाशोकांतिका…

शेवटच्या टप्प्यात काही प्रकाशवृत्त वाहिन्यांचे काही पत्रकार आणि त्या वाहिन्यांवरचे काही तथाकथित राजकीय विश्लेषक यांचे ‘विशफूल थिंकिंग’ वगळता अपेक्षेप्रमाणे बांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नारायण राणे दणकून हरले. शेवटच्या टप्प्यात या वाहिन्यांनी ‘राणे जोरदार टक्कर देणार’, ‘कदाचित ते विजयी होणार’, असे जे ‘हाईप’ केले त्यामागची कारणे काहीही असोत पण, दस्तुरखुद्द …

फडणवीस, रयतेचे मुख्यमंत्री व्हा!

पत्रकारितेत १९७८ साली आल्यानंतर नागपूर शहरात २६ वर्ष वास्तव्य झाले. या शहराने वार्ताहर ते संपादक असा माझा प्रवास पहिला. सुख-दुखाच्या क्षणी या शहराने भावना मोकळ्या करण्यासाठी मला आधार दिला. हे शहर, तेथील अगणित भली-बुरी माणसे, रस्ते, झाडे, अनेक संस्था, वास्तू, असह्य टोचरा उन्हाळा, बोचरी थंडी, बेभान पाऊस… इत्यादी इत्यादी माझ्या …

कारण ‘राज’ आणि शिवाजीराव देशमुख

औरंगाबाद महापालिकेच्या येत्या निवडणुकीच्या चाचपणीसाठी आलेल्या राज ठाकरे यांची भेट झाली. अर्थातच भरपूर गप्पा झाल्या. मी म्हणालो, ‘फार उशीर केला तुम्ही औरंगाबादची निवडणूक लढवण्यासाठी यायला. या शहराची वाट लावली आहे. एके काळी टुमदार आणि देखणं असणारं हे गाव बकाल करून टाकलंय लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा-बारा वर्षात’. राज ठाकरे म्हणाले, ‘म्हणूनच नाही …

कलगीतुरा – महाराष्ट्र आणि बिहारमधला

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सर्व काही सुरळीत नाही हे काही आता लपून राहिलेले नाही. या सरकारातील मुख्यमंत्र्यासकट सर्वांनीच अंतर्गत धुसफुस म्हणा की नाराजी वेळोवेळी जाहीर करण्यात कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. भाजपातील एकनाथ खडसे या ज्येष्ठ मंत्र्याने लाख्खो मराठी माणसाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात विठोबा-रुखमाईच्या आरतीनंतर मुख्यमंत्रीपदी बहुजनांचा प्रतिनिधी (म्हणजे …

डिलीट न होणारी माणसं…

एक म्हणजे, दैववादी किंवा नियतीवादी नसल्याचा तोटा काय असतो तर, आर आर पाटील यांच्या मृत्यूचे समर्थन करता येत नसल्याने त्याचे खापर कोणावर तरी फोडून मोकळे होता नाहीय. दुसरे म्हणजे, हे विधान करत असतानाच हेही स्पष्ट केले पाहिजे की, मी काही आरआर यांच्या खास वगैरे वर्तुळात नव्हतो. तरीही त्यांच्या मृत्यूची बातमी …

काँग्रेसने मळवलेल्या वाटेवर भाजप !

आपल्या करिष्म्यावरच पक्षाचे अस्तित्व अवलंबून आहे आणि हा करिष्मा नसेल तर पक्षाचे बहुसंख्य उमेदवार नगर पालिकांच्या निवडणुकीतही विजयी होऊ शकत नाहीत हे लक्षात आल्यावर म्हणजे; साधारण १९७१नंतर इंदिरा गांधी यांचा एकछत्री अंमल कॉंग्रेसमध्ये सुरु झाला. केंद्र सरकार आणि पक्षाची राष्ट्रीय पातळीवरची सूत्रे दिल्लीत एकवटली असणे स्वाभाविकच होते पण, राज्य पातळीवरची …

जबाबदारी विसरलेले विरोधक

‘संत शिरोमणी’ जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात गैरवर्तन केले म्हणून त्यांना या अधिवेशनापुरते निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी पूर्ण अधिवेशनभर कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, नंतर आव्हाड यांचे निलंबन रद्द होताच बहिष्कार मागे घेतला. सभागृहात जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एका सदस्याने केलेल्या गैरवर्तनाचे समर्थन महत्वाचे वाटते हा संदेश या …

काँग्रेस पतनाचे नायक!

विधान सभेचे निकाल लागल्यापासून माध्यमांचा रोख शिवसेना-भारतीय जनता पक्षात होणारी किंवा न होणारी युती, शरद पवार यांची खेळी आणि या आभासी युतीतील रुसवे-फुगवे या भोवती केंद्रीत राहिला. अल्पमतातील भाजप सरकारने विधानसभेत संपादन केलेले विश्वासमत(?) आणि त्याची वैधता याचा तडका मध्यंतरी त्यावर मारला गेला. ही युती होईल किंवा नाही आणि झाली …