‘मनोहर’ असलं आणि नसलं तरी…

आपण एक समंजस समाज म्हणून बहुसंख्येनं जशी चर्चा करायला हवी ती करत नाही, अनेक बाबींचा मुलभूत विचार करत नाही; अशी होणारी तक्रार रास्तच आहे. त्यामुळे जे काही तथाकथित मंथन घडत असतं ते फारच वरवरचं असतं, अनेकदा तर ती एक गल्लतच असते. थोडक्यात आभासी प्रतिमांच्या आहारी जाणं, हे आपल्या समाजातील बहुसंख्यांचं …

भय इथले संपावे…

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अभिमानाने मिरवणाऱ्या महाराष्ट्राची घुसमट झालेली आहे, असं भाष्य तीन आठवड्यापूर्वी केलं होतं पण, आता राज्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती त्यापेक्षा जास्त चिघळली आहे. धर्म आणि जात-पोटजात-उपजात अशी समाजाची मोठी विभागणी सुरुच आहे. मराठा, दलित, बहुजन, धनगर, मुस्लीम अशी ही दरी …

संशयकल्लोळ

=१= औरंगाबादला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीवर प्रथेप्रमाणे काही मोर्चे निघाले. सरकार दरबारी आपले गाऱ्हाणे घालण्याचा तो एक लोकशाहीतला मार्ग आहे. एक मोर्चा विना अनुदानित शाळातील शिक्षकांचा होता. अन्य कोणत्याही मोर्चावर बळाचा वापर करावा लागला नाही पण, शिक्षकांच्या मोर्चावर पोलिसांना लाठीमार करावा लागला. कारण अनुदानाची मागणी प्रदीर्घ काळापासून मान्य होत नसल्यानं निराश …

आमदारांविरुद्ध मतलबी ओरड !

विधि मंडळाच्या सदस्यांचे वेतन आणि भत्ते वाढल्यावर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल मिडियात अशा काही प्रतिक्रिया व्यक्त होताहेत की, जणू काही आधीच मवाली असलेल्या आमदारांनी, कुणाचा तरी खून करून राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे. अर्थात, ही भावना निर्माण करण्यास बहुसंख्य राजकारण्यांचे शिसारीसदृश्य पंचतारांकित राहणीमान, सप्ततारांकित मग्रुरी आणि राजकारणाचं झालेलं बाजारीकरण जबाबदार …

वेगळ्या विदर्भाचं (वार्षिक) तुणतुणं!

मावळत्या आठवड्यात स्वतंत्र विदर्भाचं तुणतुणं वाजवण्याचा (वार्षिक) राजकीय उपचार पुन्हा एकदा पार पडला. सत्ताधारी किती उतावीळ आणि विरोधी पक्ष किती अदूरदर्शी आहे, हेच त्यातून दिसलं. भाजप-सेना युतीच्या अर्ध्या मंत्रीमंडळावर एका पाठोपाठ भ्रष्टाचाराचे आरोप विरोधी नेत्यांकडून झालेले आहेत. आर्थिक घोटाळ्यांच्या आघाडीवर ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ आरोपींच्या पिंजऱ्यात उभी केली गेली; कॉंग्रेस आणि …

छत्रपतींचे पेशवे की पेशव्यांचे छत्रपती…

पंतप्रधान न होऊ शकलेले ; गेला बाजार राज्यात स्वबळावर सत्ता संपादन न करू शकलेले आणि संयमी, विचारी, मनात काय चाललंय याची पुसटशीही चुणूक चेहेऱ्यावर उमटू न देण्याचं कौशल्य असणारे, ‘जाणता राजा’ अशी प्रतिमा असणाऱ्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा छत्रपती-पेशवे म्हणजे ‘मराठा-ब्राह्मण’ वाद उकरून काढला आहे. स्वत: इतकी दशकं सत्तेत …

(महा)राष्ट्रवादी निराशा !

मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमच्या गप्पा सुरु होत्या. राष्ट्रवादीचे स्वच्छ समजले जाणारे हेवीवेट जयंत पाटील यांनी, ते राज्याचे मंत्री असताना केलेल्या संशयास्पद आर्थिक गैरव्यवहाराची माहिती राज्याचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी आनंद कुळकर्णी आमच्याशी शेअर करत होते; तेव्हाच मुंबईत षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा १७ वा वर्धापन दिन …

नारायणागमन !

हा मजकूर प्रकाशित होईल तोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेतून विधानपरिषदवर निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे संपलेली असेल आणि दिवाकर रावते, सुभाष देसाई, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर प्रभृतींसोबत नारायण राणे यांचा विधिमंडळात प्रवेश झालेला असेल. आपण जनाधार गमावला असून आता आपल्याला सांसदीय राजकारणात मागील दरवाजाने प्रवेश केल्याशिवाय पर्याय नाही, हे कटू सत्य अखेर नारायण राणे …

जय हो, अम्मा !

जयललिता जर क्रिकेट खेळत असत्या आणि त्या फलंदाजीला आल्या तर, मैदानावरचे क्षेत्ररक्षक, गोलंदाज आणि पंच त्यांना साष्टांग दंडवत घालत आहेत, असं एक व्यंगचित्र नुकतच पाहण्यात आलं. जयललिता नावाचं व्यक्तीस्तोम त्यातून ध्वनित होतं तसंच, तामिळनाडूच्या राजकारणातली लाचारी, बिनकणाही त्यातून समोर येतो. विधानसभा निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षानं सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला जाण्याची …

संतपीठाचं त्रांगडं !

“सरकारी काम अन सहा महिने थांब” ही म्हण तद्दन खोटी असून ही म्हण प्रत्यक्षात “सरकारी काम अन ते पूर्ण होणार नाही, कायम थांब” अशी आहे, याची प्रचीती गेली सुमारे छत्तीस वर्ष रेंगाळलेल्या पैठणच्या संतपीठाच्या संदर्भात येते आहे. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांनी २३ जानेवारी १९८१ रोजी मराठवाडा विकासाचा …