फडणवीसांचा ‘चव्हाण’ व्हायला नको…

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची नेमकं सांगायचं तर हा मजकूर प्रकाशित होईल त्यादिवशी ४४२ दिवस झालेले असतील. यातून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यातील नेतृत्वगुण मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या सुमारे सव्वा वर्षात सिद्ध केले असले तरी कर्तृत्वाचा ठसा कायमस्वरूपी उमटवण्यासाठी त्यांना अजून बरीच मोठी मजल मारावयाची आहे. अन्य कोणा सहकाऱ्याची प्रतिमा कशी असोही, देवेंद्र …

हातचं राखून केलेलं आत्मकथन !

देशाचे ‘सर्वोत्तम पंतप्रधान न होऊ शकलेले शरद पवार’ यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने मिडिया गेला पंधरवडा घाईत होता. असायलाच हवा, कारण या उंचीचा आणि इतकं बहुपेडी व्यक्तिमत्व असलेला नेता महाराष्ट्राने गेल्या पन्नास वर्षात पहिलाच नाही. आमच्या पिढीची पत्रकारिता तर शरद पवार यांची राजकारण आणि शरद जोशी यांनी उभारलेल्या शेतकरी चळवळीच्या करिष्म्यावर फुलली, …

वसंतदादा, लालूपुत्र आणि जगण्याची शाळा !

बालवाडी, शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठात मिळालेल्या ज्ञानाच्या कक्षा जगण्याच्या शाळेत व्यापक होतात, जगतानाच आकलनाच्या कक्षा विस्तारतात. जगण्याच्या शाळेतलं शिक्षण टोकदार, वास्तवदर्शी, सुसंस्कृतपण जोपासणारं, माणुसकीला उत्तेजन देणारं आणि बहुपेडी अनुभवांनी माणसाला समृद्ध करणारं असतं. जन्मल्यावर पहिल्या श्वासापासून हे जगण्याच्या शाळेतलं शिक्षण सुरु होतं आणि जगण्याचा शेवटचा श्वास घेईपर्यंत या शाळेत आपणच …

फडणवीसांचा रडीचा डाव !

नोकरशाही सहकार्य करत नाही, अशी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे दुसऱ्यांदा केली आहे. ते मुख्यमंत्री झाल्याला एक वर्ष पूर्ण झाल्यावर करण्यात आल्यानं ही तक्रार गांभीर्यानं घेणं भाग आहे. या तक्रारीचा एक अर्थ असा की, खुद्द मुख्यमंत्र्याचे ऐकत नाही म्हणजे अन्य मंत्र्यांचेही आदेश ही नोकरशाही पाळत नाही. दुसरं, नोकर मालकाचं …

‘चोख आणि रोखठोक’ शशांक मनोहर !

– तो मोबाईल वापरत नाही. – तो भ्रष्टाचार करत नाही आणि इतरांना करू देत नाही. – तो नियम पाळतो आणि इतरांनीही ते पाळावेत असा त्याचा आग्रह करतो. – तो ज्या संघटनेसाठी काम करतो तेथून एकाही पैशाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ घेत नाही; म्हणजे प्रवास किंवा कार खर्च नाही..मानधन काही नाही. …

राहुलसाठी दिल्ली दूरच…

स्वप्न विकायची आणि मतं घ्यायची असा आपल्या देशाच्या सत्ताप्राप्तीच्या समकालीन राजकारणाचा उसूल आणि ‘गरीबी हटाव’ ते ‘अच्छे दिन’ असा हा दीर्घ पल्ला आहे. इंदिरा गांधी यांनी दाखवलेल्या स्वप्नाने तो सुरु झाला आणि नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत तो आता पोहोचला आहे. या प्रवासात काही काळ जयप्रकाश नारायण यांच्या आशीर्वादानं मोरारजी देसाई, इंदिरा …

काळीज कुरतडवणा-यांचा महाराष्ट्र…

* पालन-पोषण करणं अशक्यच झालं म्हणून अगतिक झालेल्या परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं त्याची बैलजोडी एकही छदाम न घेता समोरच्याच्या हवाली केली – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून ही माहिती दिली आहे. * पाणी नाही, चारा नाही म्हणून गेल्या दोन वर्षात खंगलेल्या जर्सी गायींनी शेवटचा श्वास घेतल्याचं …

बिहारी फटाके !

निवडणुका जाहीर होण्याआधी आणि दिवाळी बरीच दूर असताना बिहारात फटाके फुटायला लागले आहेत. अर्थातच हे फटाके राजकीय आहेत. विकासाचे तथाकथित गुजराथी मॉडेल घेऊन देश चालवणारे नरेद्र मोदी आणि सर्वच बदलौकिकाच्या गटारगंगेतून बिहारला शुद्ध करणारे नितीशकुमार हे दोघे सध्या राजकीय फटाके फोडण्यात आघाडीवर आहेत आणि बिहारातील लढाई या दोघातच झाडणार आहे. …

कर्कश्श, टोकाचे एकारलेले राजकारण !

‘मेरी मुर्गी की एकही टांग’ अशी एक म्हण लहानपणी मराठवाड्यात अनेकदा ऐकायला मिळायची, या म्हणीचा अर्थ ‘माझंच म्हणणं खरं आणि त्यासाठी कितीही एकारली भूमिका घेण्याची वृत्ती’ असा होता. याच वृत्तीची लागण आपल्या देशाच्या पुरोगामी-प्रतिगामी, डाव्या-उजव्या, सरळ-वाकड्या अशा वेगवेगळ्या राजकीय वाटांवर चालणाऱ्या बहुसंख्याना झालेली आहे, किंबहुना आपल्या देशातील राजकारणाचे ते एक …

दिलखुलास आणि ऐटदार गवई…

सत्तेच्या दालनात प्रदीर्घकाळ पत्रकारिता करताना अनेक नेत्यांना भेटता आलं.त्यात रा. सू. गवई लक्षात राहिले ते दिलखुलास, लोभस व्यक्तिमत्व, ऐटदार राहणी आणि त्यांची समन्वयवादी वृत्ती. त्यांच्या निधनाचं वृत्त आल्यावर सर्वात प्रथम आठवला तो त्यांचा पानाचा डबा.. लगेच त्यातील केशराचा गंधही दरवळला. रा. सू. गवई यांचा लवंग, विलायची, जर्दा, केशर असलेला पानाचा …