मुंडे नावाचा झंझावात थांबला..

मुंडे नावाचा झंझावात थांबला … मृत्य अटळ आहे असे कितीही समर्थन केले तरी गोपीनाथ मुंडे यांच्या अनपेक्षित मृत्यूचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही . वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात असंख्य वादळांना कधी बेडरपणे, कधी समंजसपणे , कधी सोशिकपणाने तर कधी जाणीवपूर्वक सोशिकपणाने सामोरे गेलेल्या मुंडे यांचा मृत्यू एका अत्यंत किरकोळ …

पंतप्रधानपद..जात्यंधता आणि मुलायमसिंह

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सध्या चर्चा आहे ती केवळ निवडणुकीची आणि उत्सुकता आहे ती निकालाची. दिल्लीत नेहेमीच चर्चा आणि वावड्यांना ऊत आलेला असतो. यासाठी वेळ-काळ आणि ऋतुंचे बंधन तसेही नसतेच. राजकीय पक्षांची कार्यालये, नेत्यांची निवासस्थाने किंवा ही कार्यालये आणि निवासस्थाने असलेल्या परिसराच्या आसपासच्या बारमध्ये एखादी चक्कर टाकली की अनेक अफवा-गॉसिप-वावड्या; काही म्हणा …

तिशीतल्या मतदारांचा दृष्टीकोन… पण, लक्षात कोण घेणार ?

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान आता नजरेत आलेले आहे आणि त्यात दिल्लीच्या सातही जागा आहेत. त्यामुळे उर्वरित सर्व टप्प्यातील उमेदवार जाहीर झाले आणि पहिल्या टप्प्यातले मतदान संपले आणि की दिल्लीतील राजकीय वर्दळ शांत होईल ती थेट मे महिन्याच्या १०-१२ तारखेपर्यंत. तोपर्यंत कोण सत्तेत येणार याचा साधारण अंदाज आलेला असेल आणि …

ममतांचा (तात्पुरता ?) मुखभंग!

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तापलेल्या सध्याच्या राजकीय वातावरणात पंतप्रधानपादासाठी इच्छुक अनेकजण आहेत . नरेंद्र मोदी , राहुल गांधी , मुलायमसिंग , जयललिता , मायावती आणि आता ममता बँनर्जी ! शिवाय सुप्त इच्छा बाळगणारे पी.चिदंबरम तसेच डार्क हॉर्स राजनाथसिंह आहेत , नाही नाही म्हणत अरविंद केजरीवाल आहेत , स्पर्धेतून बाहेर पडलेले शरद …

चला, शेतकऱ्यांसाठी एक पणती पेटवू यात…

//१// आसवांवर पिक काढावं म्हटलं तर डोळे आटलेले आहेत, अशा भयाण परिस्थितीतून गेल्या आठवड्यात राज्याच्या दुष्काळी आणि त्यातही प्रामुख्यानं मराठवाड्याची बऱ्यापैकी मुक्तता झाली आहे. परतीची वाट धरताना मान्सूननं अनेक भागात दिलासादायक हजेरी लावली. जोरदार नाही तरी मध्यम पावसाच्या सरी चांगल्या बरसल्या. नदी-ओढे चार-दोन दिवस वाहिले. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न …

सत्ताधुंद आणि आचरटेश्वरांच्या देशा !

‘राजीव गांधी यांनी नायजेरियन (म्हणजे काळ्या वर्णाच्या) मुलीशी लग्न केले असते तर त्या मुलीला कॉंग्रेसने नेता म्हणून स्वीकारले असते का ?’ अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सोनिया गांधी यांच्या वर्णाच्या संदर्भात केलेली टिप्पणी कोणाही सुसंस्कृत आणि सभ्य माणसाला असभ्य, अश्लाघ्य आणि निर्लज्जपणाचा कळस वाटणारी असली …