निवडणूक निकाल : थोडी खुशी , थोडा गम !
‘काँग्रेसच्या अपयशात भाजपचं यश आहे’ किंवा ‘अमुक तमुक पक्षाचा सुपडा साफ झाला’ वगैरे शब्दांत गुजरात , हिमाचल प्रदेशच्या विधानसभा आणि दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचे विश्लेषण करण्याच्या आजवरच्या प्रस्थापित भाबड्या राजकीय मानसिकतेतून बाहेर येत या निवडणुकांच्या निकालाकडे पाहायला हवं . कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष कांही निवडणुकीत संपत नाही , हे लक्षात घ्यायला …