शब्दांच्या भूमीत सकस लेखनाचं पीक काढणारा लेखक …
आमच्या पिढीनं काळ्यावर पांढरं करायला सुरुवात केली तोपर्यंत कवी आणि कथालेखक म्हणून नागनाथ कोत्तापल्ले यांचं नाव मराठी साहित्याच्या प्रांगणात चर्चेत आलेलं होतं . हा लेखक खूप समजून उमजून लिहितो , अनेकदा तर आपल्याला जे म्हणावसं वाटतं तसंच लिहितो , अशी जवळीक कोत्तापल्ले यांच्या लेखनाविषयी तेव्हाही वाटायची . तेव्हा ते बीडला प्राध्यापक होते आणि …